नियम व अटी

- ही स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न महाविद्यालये, कृषी तंत्रज्ञान विद्यालये आणि कृषीशी संबंधित संस्था येथील पदवी / पदविकेचे शिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी खुली आहे.
- स्पर्धेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनीं संबंधित महाविद्यालयात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- स्पर्धेचे कृषी विद्यापीठनिहाय पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व कोकण असे चार विभाग करण्यात आले असून स्पर्धा विभागवार वेळापत्रकानुसार घेण्यात येतील.
- स्पर्धेचे संपूर्णपणे भरलेले प्रवेश फॉर्म स्पर्धकांच्या फोटोसहीत विद्यार्थी कल्याण अधिकार्‍याकडे दि. १५ डिसेंबर २०१० पुर्वी जमा करणे आवश्यक आहे.
- विभागवार स्पर्धेतून प्रत्येक विषयातील प्रथम तीन विजेते महाअंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
- प्रत्येक विभागात त्या परिसरातील अनुभवी व तज्ञ व्यक्ती परीक्षक म्हणून काम पाहतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- प्रत्येक स्पर्धकाने महाविद्यालयाचे फोटोसहितओळखपत्र (आयकर्ड) व संबंधित प्राचार्यांचे पत्र आणणे आवश्यक आहे.
- विभागवार स्पर्धेसाठी येणार्‍या स्पर्धकांच्या येण्याजाण्याची व्यवस्था संबंधित संस्थेने किंवा महाविद्यालयाने करावयाची असून राहण्याची व्यवस्था संबंधित विद्यापीठाने करावयाची आहे. मात्र भोजन व नाश्त्याच्या खर्चाची तरतूद सिटा व पुणे जिल्हा कृषी विकास प्रतिष्ठान यांचेमार्फ़त करण्यात येईल.
- लेखन स्पर्धा, वक्तृत्व व लाईट इंडियन म्युझिक या स्पर्धांत फक्त कृषी महाविद्यालयीन विद्यार्थीच सहभागी होऊ शकतात. व उर्वरित स्पर्धेत कृषी, संलग्न महाविद्यालये व कृषीतंत्रज्ञान विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
- महाविद्यालये सर्व स्पर्धांमध्ये आपले स्पर्धक पाठवू शकतात. मात्र एका स्पर्धेत एका महाविद्यालाचा प्रत्येकी एकच संघ भाग घेऊ शकेल.
- लेख स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांचे लेख सिटाचे मुखपत्र असलेल्या 'शरद कृषी' या मासिकात प्रसिद्ध होतील. लेख लिहिताना त्याची संकल्पना स्वत:ची असावी.
- स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही.
- स्पर्धेचे दूरचित्रवाहिनीवर रेकॉर्डेड प्रसारण करण्यात येईल व त्याचे सर्व अधिकार व हक्क संयोजकांकडे राहतील.
- स्पर्धेसाठी लाईटस्, माईक्स, रेकॉर्ड प्लेअरची व्यवस्था करण्यात येइल. मात्र आवश्यक वाद्ये, सीडीज् स्पर्धकांनी आणावयाच्या आहेत.
- स्पर्धेकारिता मागील वर्षी सादर केलेले लेख, समुह नृत्य, शेतकरी वेशभूषा, शेतकरी गीत गायन व वक्तृत्व स्पर्धेचे विषय/ संकल्पना सादर करता येणार नाहीत.
-पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील स्पर्धकांनी त्यांची महाविद्यालये ज्या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली असतील त्यांच्याशी स्पर्धेबाबत संपर्क साधावा.

सांघिक स्पर्धा बक्षिसे

स्पर्धेतील विभागवार बक्षिसे

  • प्रथम क्रमांक : रु. ५०००/- व सन्मानचिन्ह
  • द्वितीय क्रमांक : रु. ३०००/- व सन्मानचिन्ह
  • तृतीय क्रमांक : रु. २०००/- व सन्मानचिन्ह

अंतिम फेरी बक्षिसे

  • प्रथम क्रमांक : रु. ३१०००/- व करंडक
  • द्वितीय क्रमांक : रु. २१०००/- व करंडक
  • तृतीय क्रमांक : रु. ११०००/- व करंडक

वैयक्तिक स्पर्धा बक्षिसे

स्पर्धेतील विभागवार बक्षिसे

  • प्रथम क्रमांक : रु. ३०००/- व सन्मानचिन्ह
  • द्वितीय क्रमांक : रु. २०००/- व संमानचिन्ह
  • तृतीय क्रमांक : रु. १०००/- व संमानचिन्ह

अंतिम फेरी बक्षिसे

  • प्रथम क्रमांक : रु. ११०००/- व करंडक
  • द्वितीय क्रमांक : रु. ५०००/- व करंडक
  • तृतीय क्रमांक : रु. ३०००/- व करंडक